सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड गौरव भूमिपुत्रांचा पुरस्काराने सन्मानीत नांदेड : सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांचा गौरव भिमपुत्राचा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. कंधार तालुक्यातील पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन सकाळ माध्यम समूहाने त्यांना गौरव भूमिपुत्रांचा या पुरस्काराने सन्मानित केले आहे. नांदेड येथे आयोजित एका भव्य पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नारायण गायकवाड यांनी आरोग्य, शिक्षण व्यसनमुक्ती स्त्रि सक्षमीकरण त्याचबरोबर अंधश्रद्धा विरोधी आणि मूलभूत नागरी समस्या आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून पेठवडज परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत प्रश्नावर त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहेत. परिसरातील मोठी बाजारपेठ असलेल्या पेठवडज येथील जि. प. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी व शाळेत विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळवण्याच्या मागणीसाठी नारायण गायकवाड यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. ह
पोस्ट्स
सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मांजरम येथिल आदिवासी कुटूंबावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा - मा.क.प चे आंदोलन नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम येथील आदिवासी मन्नेरवारलू कुटूंबावर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.या मागणीला घेऊन दि १४ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. दि ३ सप्टेंबर रोजी आदिवासी कुटूंबावर काठ्या व घातक शस्त्रानी मारहाण करून जख्मी करण्यात आले.या मारहाणीत आदिवासी कुटूंबीय गंभीर जख्मी झाले होते. माराहाण करणाऱ्या विरोद्धात नायगाव पोलीस स्टेश्न मध्ये अँट्रासिटी व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परतू मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांना अध्याप अटक करण्यात आले नाही.त्यामुळे मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.