मांजरम येथिल आदिवासी कुटूंबावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा - मा.क.प चे आंदोलन
नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम येथील आदिवासी मन्नेरवारलू कुटूंबावर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.या मागणीला घेऊन दि १४ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
  दि ३ सप्टेंबर रोजी आदिवासी कुटूंबावर काठ्या व घातक शस्त्रानी मारहाण करून जख्मी करण्यात आले.या मारहाणीत आदिवासी कुटूंबीय गंभीर जख्मी झाले होते. माराहाण करणाऱ्या विरोद्धात नायगाव पोलीस स्टेश्न मध्ये अँट्रासिटी व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परतू मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांना अध्याप अटक करण्यात आले नाही.त्यामुळे मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग मराठवाडाविभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगावकर यांची निवड