सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड गौरव भूमिपुत्रांचा पुरस्काराने सन्मानीत
नांदेड : सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांचा गौरव भिमपुत्राचा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
कंधार तालुक्यातील पेठवडज येथील ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन सकाळ माध्यम समूहाने त्यांना गौरव भूमिपुत्रांचा या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नांदेड येथे आयोजित एका भव्य पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नारायण गायकवाड यांनी आरोग्य, शिक्षण व्यसनमुक्ती स्त्रि सक्षमीकरण त्याचबरोबर अंधश्रद्धा विरोधी आणि मूलभूत नागरी समस्या आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून पेठवडज परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत प्रश्नावर त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहेत. परिसरातील मोठी बाजारपेठ असलेल्या पेठवडज येथील जि. प. शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी व शाळेत विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळवण्याच्या मागणीसाठी नारायण गायकवाड यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. हत्तीपाय रोगासारख्या रोगाचा नायनाट व्हावा व प्रशासनाने या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तळ्याच्या निचरा होणाऱ्या पाण्यामुळे या डबके सासून परिसरात पसरणारी रोगराई व हत्तीरोगासारखे आजार यांचा बीमोड करण्याच्या मागणीसाठी व गावातील इतर मागण्यासाठी नारायण गायकवाड यांनी पेठवडज येथून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न पायी मार्च आंदोलन केले होते. या आंदोलनाची सर्व दूर चर्चा झाली व आरोग्याच्या समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले. गावात असलेली अति जीर्ण झालेली जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने उभारण्यासाठीही नारायण गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. या व अशा अनेक उल्लेखनीय कार्यांची दखल घेत सकाळ माध्यम समूहाने त्यांना गौरव भूमिपुत्रांचा हा मानाचा पुरस्कार माजी विभागीय आयुक्त तथा नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र दीपक मैसेकर यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित केले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे औरंगाबाद विभागीय निवासी संपादक दयानंद माने यांची उपस्थिती होती.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे