विविध सेवा कार्याबद्दल ५ सप्टेंबर रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर  यांना  'अखंड सेवावृत्ती ऊर्जा गौरव ' पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक कुलदीप सुर्यवंशी गोणारकर यांनी दिली आहे. ठाकूर यांच्या पुरस्काराची संख्या ८२ होत असल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नमस्कार चौक नांदेड येथील गणराज हॉटेलमध्ये होणाऱ्या 
दैनिक वृत्त महानगर च्या द्विपृती वर्धापन दिनाच्या सोहळ्यात  अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या बाबत माहिती देताना कुलदीप सूर्यवंशी यांनी असे सांगितले आहे की , तेरा वर्षात ७ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे गरजूंना वाटप करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी समाजसेवेमध्ये एक अनोखा पायंडा पाडलेला आहे. वर्षभरातून एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८३ उपक्रम ते नांदेडमध्ये घेतात. रस्त्यावर फिरणाऱ्या वेड्या लोकांना दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एकत्र करून त्यांची दाढी कटिंग करण्यात येते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ घालून नवीन कपडे व शंभर रुपये बक्षीस देण्याचा आगळावेगळा कायापालट हा उपक्रम गेल्या ३२ महिन्यापासून सुरू आहे.अन्न वाया जाऊ नये तसेच नांदेड शहरात कोणीही उपाशी राहू नये यासाठी  भाऊचा माणुसकीचा फ्रिज ठेवण्यात आला आहे. गेल्या ११ महिन्यापासून एकही दिवस खंड न  पडता दररोज किमान ४० ते १२० डबे  या फ्रिजमध्ये ठेवण्यात येतात.चार वर्षापासून दरवर्षी  हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघर नागरिकांना २००० पेक्षा जास्त  ब्लॅंकेट चे वाटप  त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. पावसाळ्यात कृपा छत्र या उपक्रमां अंतर्गत आतापर्यंत चार वर्षात आठ हजारापेक्षा जास्त छत्र्याचे वाटप करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या व्यक्तींसाठी चरण सेवा या उपक्रमा अंतर्गत चप्पला वाटप करण्यात येते. देशातील सर्वात मोठे कवी संमेलन नरेंद्र देवेंद्र महोत्सव गेल्या वीस वर्षापासून दिलीपभाऊ घेत असतात. या कार्यक्रमाला लाखो रसिक रात्रभर उपस्थित राहतात. रक्तदान हे श्रेष्ठदान म्हटले जाते स्वतः४२ वेळा रक्तदान करून ५६००  पेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या दिलीप ठाकूर यांनी जमा केले आहेत. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे