सहलीच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट

सहलीच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट 

गौतम येरेकर 

किनवट : विद्यार्थ्यांना वार्षिक शिक्षणासोबत सहलीला नेणे हे एक शिक्षणाचा एक मुद्दा  असून किनवट तालुक्यातील काही नामवंत शिक्षण संस्था यांनी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करत शैक्षणिक सहलीच्या नावाखाली पैसा कमावण्याचा गोरख धंदा चालू केला असल्याची खळबळ जनक चर्चा परिसरामध्ये होत आहे .
          सविस्तर वृत्त असे की पालक वर्ग आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून नामावंत शाळेकडे वळले दिसत आहे असंख्य पालक वर्ग गरीब परिस्थितीतून आपल्या मुलांना शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता मोल मजुरी करत शाळेचा खर्च जमावण्याच्या प्रयत्नात असतात .शहर व परिसरातील अनेक पालकांचा कल हा खाजगी शिक्षण संस्थेकडे वळला असून येथील काही संस्था योग्य प्रमाणात विद्यार्थ्यांना शिक्षण देतात तर काही संस्था उच्च शिक्षण या नावाखाली नाना तरीके ची फीज सांगत वसुली करून पालकांची आर्थिक लुट करत असल्याची चर्चा आहे .
           विद्यार्थ्यांना शिक्षण घेत सर्व शैक्षणिक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांची वार्षिक सहल नेने हा एक विषय असून विद्यार्थ्यांकडून जवळीक अंतरावर नेत अधिक पैसे वसुली करत त्या विद्यार्थी पालक वर्गातुन आर्थिक लुट करत असल्याचे खळबळजनक चर्चा पालक वर्ग व इतर स्तरावरून काही नामावंत संस्थेबद्दल होत आहे . 
      शिक्षण संस्थेतील विद्यार्थी हे संपूर्ण ज्ञानी संस्थेतील शिक्षण संस्थेमुळे होत नसून त्यांच्या पालकांना आपले पाल्य हुशार होण्याकरिता कोचिंग क्लासेस लावावे लागतात व या कोचिंग क्लासेस साठी विशेष फीज भरावी लागते हा सर्व भुर्दंड पालक वर्गाला बसत असून ज्या नावाखाली उच्च शिक्षण संस्था म्हटले जाते त्याचप्रमाणे त्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणही त्यात प्रकारे देण्याची मागणी होत आहे .

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे