प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंन्स
नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने इंजी.अंकुश पार्डीकर यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालय विष्णू कॉम्पलेक्स व्हि.आय.पी.रोड नांदेड येथे भूमिहीन शेतमजूर,कोरोनात ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व हिरावले,अनाथ मुलांसाठी ज्यांना आई-वडील नाहीत अशा होतकरू,गरीब विद्यार्थ्यांसाठी
मोफत लर्निंग ड्रायव्हिंग लायसेंन्स हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक इंजी.पार्डीकर यांनी केले आहे.