या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
epapermahanagar on 13 may 2024
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग मराठवाडाविभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगावकर यांची निवड
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगांवकर यांची नुकतीच प्रसिद्धी पत्राद्वारे निवड जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगांवकर यांची नियुक्ती केलेली आहे. संतोष दगडगांवकर हे गेल्या अनेक वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रंथ निवड समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ग्रंथालयाचा प्रसार, प्रचार आणि प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचा अनेक वेळा दौरा देखील केलेला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि प...