गजभारे सुमित यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश 
नांदेड : प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहर उपाध्यक्ष पदी वाजेगाव येथील तरुण सक्रिय कार्यकर्ते सुमित गजभारे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम साहेब व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी उपमहापौर डॉ.सौ.शिलाताई कदम,प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.कल्पनाताई डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे, सरचिटणीस गणेशभाऊ तादलापूरकर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष गंगाधर कवाळे पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग मराठवाडाविभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगावकर यांची निवड