खा.हेमंत पाटील यांच्या विरोधातील खोटी अँट्रॉसिटी व ३५३ च्या विरोधात दि.११ ऑक्टोबर रोजी नांदेडात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
खा.हेमंत पाटील यांच्या विरोधातील खोटी अँट्रॉसिटी व ३५३ च्या विरोधात दि.११ ऑक्टोबर रोजी नांदेडात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
"नांदेड मधील मृत्यंचे तांडव संपणार कधी?" मृत्युमुखींच्या आप्तेष्टांसह नागरीकांचा संतप्त सवाल
नांदेड : खा.हेमंत पाटील यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या अँट्रासिटी व ३५३ चा गुन्हा रद्द करावा यामागणीसाठी व रुग्णालयातील मृत्युंचा जाब विचारण्यासाठी दि.११ ऑक्टोबर रोजी तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चासाठी समाजातील विविध संघटनांनी सर्व स्तरातून खा.हेमंत पाटील यांना पाठींबा देवून अनेक तालुक्यांत तहसीलदार यांना खा.हेमंत पाटील यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्यांचा निषेधार्थ लेखी निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेत अतिगंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला. तसेच रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर रूग्णालयातील स्वच्छतागृहांची पाहणी करताना स्वतः अधिष्ठाता यांचेच स्वच्छतागृह अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आढळून आले
या प्रकरणी जाब विचारताच अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत.
म्हणून खा.हेमंत पाटील यांनी अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांना "दोघे मिळून स्वच्छ करु" असे आवाहन करत स्वच्छतागृह साफ केले. या घटनेचा विर्पयास करत काही जातीयवादी संघटनांनी व राजकीय विरोधकांनी डॉ.वाकोडे यांना खा.हेमंत पाटील यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी कायदया अंतर्गत दि.०३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दिवसेंदिवस मृत्यू संख्येत वाढ होत आहे. त्यात नवजात बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असंख्य लोक जगण्याची आशा घेऊन रुग्णालयात दाखल होतात पण अस्वच्छतेतून निर्माण होणाऱ्या जंतू संसर्गामुळे रुग्णालयात मृत्युंचे प्रमाण वाढत आहे. एकीकडे देशभरात स्वच्छता अभियानाचा समारोप होत असला तरीदेखील नांदेड शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे वावडे आहे असे दिसून आले या पार्श्वभूमीवर मृत लोकांच्या आप्तेष्टांना धीर द्यायचा सोडून या प्रकरणाला जाणीवपूर्वक जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी भावना मृतांचे नातेवाईक व नागरिक करीत आहेत
नांदेड येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालयात प्रशासनाच्या अनास्थेने आजवर तब्बल ८५ जणांचे बळी घेतले आहेत. त्यामध्ये २५ नवजात बालकांचा समावेश आहे. ज्यांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच खा.हेमंत पाटील यांच्या विरोधातील खोटी अँट्रॉसिटी व ३५३ चा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी जन आक्रोश समितीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे तरी या जन आक्रोश मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.