पंतप्रधान मोदीजीं च्या योजनांचा लाभ सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी–भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास 9 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त मोदी @ 9 अभियानातर्गत भाजपा उत्तर नांदेड विधानसभा तर्फे आयोजित संयुक्त संमेलनात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांसाठी असून त्याचा ते लाभ घेत आहेत असे प्रतिपादन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे सुरु असलेल्या जनसंपर्क अभियानातर्गत नांदेड उत्तर विधानसभा भाजपा महिला मोर्चा ,अनु.जाती मोर्चा.ओबीसी मोर्चा,अनु.जमाती मोर्चा,अल्पसंख्यांक मोर्चा,किसान मोर्चा,युवा मोर्चा यांच्या तर्फे आयोजित संयुक्त मेळाव्यास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला गॅस योजना,पंतप्रधान किसान सन्मान योजना या सारख्या असंख्य योजनांचा जनता
पोस्ट्स
जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी नांदेड : बहुजन युथ पँथर नांदेड आयोजीत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचीतचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर , भटके विमुक्त नेते देविदास हादवे, रिपब्लिकन सेना संदीप मांजरमकर यांची उपस्थिती होती. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व त्यांचा शुभहस्ते निळा व पंचरंगी ध्वज दाखवून मिरवणुकीची सुरूवात झाली. याप्रसंगी उपस्थित असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमाती बांधवांनी आपल्या वेषभूष ने सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले. हि मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी विक्रांत बिऱ्हाडे, सूर्यकांत पाटोळे, अमोल धमसे,सचिन खंडेलोटे, सागर ससाणे आनंद पाटील आदीनी परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले आहे. या जयंती सोहळयात मोठ्या संख्येने उपस्थित होते.