प्रविण साले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत श्रमकार्ड व उद्योग आधार नोंदणी शिबीर
नांदेड : सामाजिक कार्यकर्ते तथा लोकप्रिय नेते म्हणून सर्वपरिचित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रविणभाऊ साले यांचा येत्या ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस असून वाढादिवसाचे औचित्य साधून श्री.प्रविणभाऊ साले मित्र मंडळाच्या वतीने ॲड.अमोल मुनेश्वर यांनी विष्णू कॉम्पलेक्स व्हि.आय.पी.रोड नांदेड येथे कोणत्याही क्षेत्रातील कामगार,मजूर यांच्यासाठी मोफत श्रमकार्ड व उद्योग आधार नोंदणी शिबीर हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक ॲड.अमोल मुनेश्वर यांनी केले आहे.