बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या त्या दोघांना अखेर अटक
गौतम येरेकार
किनवट : शहरातील एका सेतू केंद्रातून दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी तहसिल कार्यालयाचे बनावट प्रमाण पत्र देणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध तहसील मधील अवल कारकून यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
किनवट शहरातील राशलवार सेतू केंद्रातून तहसिल कार्यालयाचे निर्गमित केलेल्या बारकोडवर खोटे व बनावट स्थानिक वास्तव्याचा दाखला प्रमाणपत्र, उत्पनाचे प्रमाणपत्र ,जातीचे प्रमाणपत्र ,तयार करून हे खरे आहे असे बतावणी करून खोटे प्रमाणपत्र आरोपी विनोद विठठल येरेकर रा. प्रधान सांगवी ता. किनवट व दिपक नागोराव डवले रा. खरबी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांनी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान दिल्याचे उघड झाल्याने आरोपी विरुद्ध किनवट पोलिसात तहसिल कार्यालयातील आवल कारकून गणेश भगवा न दुसाने वय ५६ वर्षे यांनी फिर्याद दिल्यावरून किनवट पोलिसात गुरन १६७ / २०२२ कलम ४२०, ४६७,४६८ ,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून आज दोन्ही आरोपीस पोलिसानी अटक केली .पुढील तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळूंखे यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शना खाली उप निरीक्षक गणेश पवार करत आहेत. आरोपीने किती लोकांना बनावट प्रमाण पत्र दिले ते तपास झाल्याने उघड होणार आहे.