आमदार बालाजी कल्याणकर यांच्या लोकप्रियतेत वाढ;बोले तैसा चाले
कुलदीप सुर्यवंशी
नांदेड : नांदेड उत्तर मतदार संघातील व परिसरातील विकास कामांमुळे मतदारात उत्साहाचे वातावरण असून लोकप्रिय लोकप्रतिनिधी अर्थातच जनसामान्यांचा आवाज म्हणजे आमदार बालाजी कल्याणकर या चर्चेने परिसर दुमदुमला आहे. विकासकामांसाठी दिलेला शब्द पाळणारा बौले तैसा चाले असा लोकप्रतिनिधीं ज्यांच्या कार्यालयात प्रत्येकाला आस्थेवाईक पाहुणचार आदरातिथ्य करुन समाधानी करुनच पाठवल्या जाते. प्रत्येक घटकातील तळागाळातील लोकांना न्याय देत अनेकांच्या बुडत्या संसाराला काडीचा आधार देऊन सोन करणारे आमदार ये जनतेच्या हक्काचा आवाजअसल्याचही बोलल्या जात आहे. यापुर्वी कुठल्यातरी गोठ्यात फसलेल्या अविकसित मतदारसंघात विकासाची नौका अपेक्षेने जास्त प्रवास केला असल्याने हा प्रवास अविरतपणे सुरु राहो अशीही प्रार्थना परिसरातील नागरिकांनी चैतन्य नगरीतील शंभु महादेवाकडे केली आहे.