फरार आरोपी खंडेलवालला त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा,भाजपचे जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले यांचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना लेखी निवेदन सादर
 

नांदेड ( प्रतिनिधी):- सोशल मीडियातून बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी दाखल ऑट्रॉसिटी गुन्ह्यातील फरार आरोपी रामप्रसाद खंडेलवाल यास  त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा नाईलाजाने आम्हास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, रामप्रसाद खंडेलवाल हा मागील अनेक वर्षापासून एक तथाकथित चॅनल माफीया असून त्याने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून वास्तव न्यूज नावाचे वेब पोर्टल सुरू केले आहे.  त्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी तसेच पदाधिकारी यांच्यावर तो द्वेष भावनेतून विशिष्ट प्रकारचे मानहानीकारक अलंकारीक विशेषण आणि शब्दप्रयोग करून अवमानकारक लिखाण केले आहे.तसेच हाताखाली काही लोकांना घेवून त्यांच्या मार्फत पैसे  उकळण्याचे  कामही तो करतो आहे.आमच्या माहितीप्रमाणे त्याच्या त्या वास्तव न्यूज चॅनेलला कुठलीही  शासनमान्य परवानगी नाही. तरीही तो स्वतःच्या मनमानीने वाटेल त्या पध्द्तीने तसेच अतिशय बेजबाबदारपणे लिखाण करून प्रशासनाची तसेच पदाधिका-यांची बदनामी सत्रे चालवत आहे.थोडक्यात तो स्वतःला जिल्ह्यापुरता शासनकर्ता समजत असून जिल्हा प्रशासनाचा एक घटक जणू माझ्याच धाकात आहे, अशाच भ्रमात तो नेहमी वावरत असतो, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच दिनाक 15 ऑगस्ट रोजी तथाकथित पत्रकार रामप्रसाद खंडेलवालने सोशल मीडियातून केलेल्या देषमुलक लिखाणामुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्यावर ऑट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तेव्हापासून तो फरार झाला आहे.तसेच त्याने अनेक वर्षापासून अशा अनेक प्रकारच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आणि वैयक्तिव द्वेष भावनेतून वास्तव पोर्टलवरून बातमीवजा मोठमोठे लेख लिहन प्रसारण केलेले आहेत.त्यामुळे हा एक सामाजिक गुन्हेगार असून अतिशय  बेमुर्वत झालेला आहे. त्यामुळे त्यास तत्काळ अटक करून त्याच्या सर्व गोरखधंद्याचा पर्दाफाश करून त्याच्या व त्या चॅनेल बाबतीत असणाऱ्या सर्व कायद्यांचा आढावा घेऊन त्याच्या त्या वास्तव चॅनेलवर त्वरित बंदी आणून त्याला जिल्हातून हद्दपार करावे.तसेच जिल्ह्यातील  पिस्टल माफिया तसेच भूमाफिया विरोधात आपण केलेल्या कठोर कारवाई प्रमाणेच अशा बोगस वेब चॅनेल माफीयांची देखील  सविस्तर माहिती घेऊन त्यांनाही जिल्ह्यातून हद्दपार करावे.कारण रामप्रसाद खंडेलवाल हा अत्यंत दुष्ट बुद्धीचा व्यक्ती असून त्याच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवावे, तसेच त्यास त्वरित अटक करण्यात यावी, अन्यथा नाईलाजाने आम्हास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष महानगर प्रवीण साले यांनी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळे पोलीस यासंदर्भात नेमकी काय कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे