राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभाग मराठवाडाविभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगावकर यांची निवड

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मा.जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगांवकर यांची नुकतीच प्रसिद्धी पत्राद्वारे निवड जाहीर केलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्षांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत. यामध्ये मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी संतोष दगडगांवकर यांची नियुक्ती केलेली आहे. संतोष दगडगांवकर हे गेल्या अनेक वर्षापासून ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अद्यापपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्रंथ निवड समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ग्रंथालयाचा प्रसार, प्रचार आणि प्रलंबित प्रश्नांसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचा अनेक वेळा दौरा देखील केलेला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि परभणी जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून त्यांनी सक्षमपणे कार्यभार सांभाळलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते निस्वार्थीपणे पक्षाच्या माध्यमातून ग्रंथालयाचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर मंत्रालयात देखील सातत्याने पाठपुरावा करीत असतात. ग्रंथालय क्षेत्रात सातत्याने काम करण्याची त्यांची तळमळ पाहून प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी त्यांना मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिलेली आहे. निवड झाल्यावर बोलताना संतोष दगडगांवकर म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिलेली जबाबदारी ग्रंथालयाच्या न्याय हक्कासाठी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढील काळात प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असून ग्रंथालयाचे प्रलंबित प्रश्न वरिष्ठांच्या माध्यमातून सोडविण्यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे, माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे, जिल्हा सरचिटणीस जांभरुणकर सर, युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, कृ.उ.बा.स. संचालक रेखा राहिरे तसेच सर्व जिल्हा कार्यकारिणी आदींनी अभिनंदन केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे