उमरी तालुक्यातील तळेगवच्या महिलेची बळेगावच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या ? बाहेर काढण्यासाठी कुंटूर पोलिसांसह मच्छीमाराची २५ मिनिटाची झुंज यशस्वी....
माधव पवार
नायगाव दि.२७ : नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या मौजे बळेगाव गोदावरी पात्रात उमरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असलेल्या एका चाळीस वर्षे विधवा महिलेने दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी आठ ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान एका अज्ञात आटोच्या द्वारे माझे कोणी तर मयत झाले असल्यामुळे मौतीस जात असल्याचे कारण सांगुन मयत विधवा महिला ही बळेगावच्या पुलावर उतरली व थंड दिमाकाचा विचार करण्या ऐवजी गरम दिमाकाचा विचार करून पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तरी सदरील विधवा महिलेचे प्रेत बाहेर काढण्यासाठी कुंटूर पोलिसासह मच्छीमारांना केवळ मिनिटाची झुंज यशस्वी करावी लागली असली तरी पुलावर बघ्याची गर्दी जमली असल्याचे दिसून आले आहे
तालुक्यातील कुंटूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बळेगाव गोदावरीच्या पात्रात अंदाजे वीस ते पंचवीस फूट पाणी असल्यामुळे उमरी तालुक्यातील तळेगाव व मनूर या गावातील दोन मच्छीमारांना आत्महत्या केलेल्या विधवा महिलेचे प्रेत गोदावरी पात्रातून बाहेर काढण्यासाठी पाचारण करण्यात आले सदरील मच्छीमारांचे नाव रमेश रामजी निलेवार तळेगाव, तसेच मलंग सरवर बेग,तालुका उमरी जिल्हा नांदेड या मच्छिमारासह कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे फौजदार दिनेश येवले, बीट जेमादार संतोष कुमरे,पोलीस कॉन्स्टेबल एस एन बुध्देवाड,टीमला केवळ पंचवीस मिनिटाची झुंज यशस्वी करावी लागली असल्याचे दिसून आले असून सदरील महिलेचे प्रेत कुंटूर पोलिसांनी ताब्यात घेऊन नायागांवच्या ग्रामीण रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे
उमरी तालुक्यातील मौजे तळेगाव येथील रहिवासी असलेली व बळेगावच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या विधवा मयत महिलांचे नाव अनिता गणपत वनपवाड वय ४० वर्षे राहणार तळेगाव हल्ली मुक्काम उमरी व माहेर मंडळा असून सदरची विधवा महिला ही सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घराच्या बाहेर पडली असल्याचे तळेगावचे उपसरपंच अयुबखान पठाण यांनी पोलिसा देखत सांगितले असून सदरची ही आत्महत्या करण्यापूर्वी बळेगावच्या पुलावर खालीवर पाहत होती व फिरत होती असे काही लोकानी सांगितले असून गोदावरी पात्रात अगोदरच मच्छीमार मासोळ्या धरणासाठी येतात त्यांना आपण आत्महत्या करत असल्याचे दिसू नये म्हणून सदरच्या विधवा मयत महिलेने फुलावर बसून तोंडाला बांधण्याची पांढऱ्या रंगाच्या फुलक्याची ओढणी व डोळ्याचा चष्मा व चप्पल पुलावर ठेवली व मच्छीमार घरी जातात महिलेने आत्महत्या केली असल्याचे समजते परंतु आत्महत्या करण्या मागचे कारण काय ? हे मात्र समजू शकले नाही मात्र वास्तव चित्र नेमकं काय याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.