अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना कार्यकारणी जाहीर



नांदेड :  अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सदर कार्यक्रम शहरातील जुना मोंढा येथे पार पडला सर्वप्रथम रेणुकामातेचे प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख म्हणून उपस्थित असलेले अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र बनारसे यांचा नांदेडचे जिल्हाध्यक्ष उल्हास काटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर काटे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत पाचंगे, अक्षय भांडे,पांडुरंग गीते हे उपस्थित होते या कार्यक्रमास समाजातील सर्व शिक्षक बंधूंचा सत्कार करण्यात आला यात व्यंकटराव पाचंगे,राजूभाऊ सुपलकर,भीमाशंकर सुपलकर, नरसिंग सुपलकर,भागवत उबाळे तद्नंतर तद्नंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपण कशा पद्धतीने सामाजिक काम करणार हे सांगितले यानंतर नांदेड जिल्हा विस्तारित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यात कार्याध्यक्षपदी चंद्रकांत पाचंगे, उपाध्यक्षपदी नरसिग सुपलकर, सचिवपदी अक्षय भांडे, सहसचिवपदी अवधूत पाचंगे कोषाध्यक्षपदी सुधाकर सहकोषाध्यक्ष अशोक विश्वंभर सावळे जिल्हा संघटक व मार्गदर्शक म्हणून विनोद पाचंगे सदस्य राजकुमार काटे,ज्ञानेश्वर शिंदे,बालाजी सूर्यवंशी,कदम यांची निवड करण्यात आली असून तद्वतच तालुका कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आले असून यात उमरी धर्माबाद तालुका अध्यक्षपदी गणेश पतंगे यांची निवड करण्यात आली हदगाव हिमायतनगर अध्यक्षपदी ज्ञानेश्वर घोडके अर्धापुर तालुका दत्ता पासंग यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी पुरभाजी पाचंगे,कंधार तालुका अध्यक्ष म्हणून सुनील सुपलकर लोहा तालुका अध्यक्षपदी अशोक तोडकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी अमर यांच्यासह सर्व समाज बांधवांची प्रमुख उपस्थिती होती

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे