किसान नवक्रांती सेनेची कार्यकारणी जाहीर

नांदेड : प्रा.साहेबराव बेळे
 किसान नवक्रांती सेनेच्या वतीने जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली असून यामध्ये सर्वागीण सामाजिक कार्याची दखल घेऊन किसान नवक्रांती सेना नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी विनायक स्वामी तर नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अजय शेळके यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष भुजबळ मारोती पाटील यांनी सदरील नवनियुक्त पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले.यासमयी  तालुकाध्यक्ष मलिकार्जुन मठपती, कोषाध्यक्ष बाळासाहेब पाटील क्षिरसागर , विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष लखन पाटील भुजबळ यांच्यासह तद्वतच किसान क्रांती सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या संघटनेचा शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच फायदा होईल आणि आपण त्यासाठी सदैव अग्रेसर असावे हीच अपेक्षा संस्थापक अध्यक्षांनी व्यक्त केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचवटी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने वैचारिक बीज पेरले -ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे