विजपुरवठा सुरळीत करावा - वंचित बहुजन आघाडी
विजपुरवठा सुरळीत करावा - वंचित बहुजन आघाडी
नांदेड : जिल्हा प्रतिनिधी
नांदेड शहर व देगलुर नाका परिसरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या विज पुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाबाबत वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीने मुख्य अंभियता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नांदेड यांच्याकडे नांदेड शहर व देगलुर नाका परिसरातील विद्युत वितरण कंपनीच्या ओव्हरलोडमुळे विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे दर २ तासात या परिसराचा विद्युत पुरवठा हमखास बंद होत असतो विशेष प्रसंगी शुक्रवार रोजी किंवा उत्सव यासारख्या दिवसात विज पुरवठा हमखास बंद होत असतो यामुळे या परिसरातील व शहरातील दिड ते दोन लाख नागरिक त्रस्त आहेत सदरील परिसरात शहरातील एक तृतिअंश यामुळे यांच्याकडे इन्वर्टर सारख्या चैनीचे साधण साहित्य उपलब्ध नाहीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थींनीना अभ्यास करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वारंवार आपणांस सद्यस्थिती सांगितल्या नंतरही नागरिकांच्या होणाऱ्या त्रासात काही एक कमी झालेली नाही उलट त्रास वाढलेला आहे जर आठ दिवसांत लोकांना होणारा त्रास थांबणार नसेल तर लोकशाही मार्गाने सदरील भागातील महिला व मुला बाळासहीत उपोषणास बसण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे केले असून निवेदनावर फारुख अहेमद,इंजि.प्रशांत इंगोले,अय्युब खान पठाण,उमेश ढवळे,एकनाथ गायकवाड,पद्माकर सोनकांबळे,डॉ.वनंजे,कैलास वाघमारे,उत्तम धर्मेकर,अहेमद खान पठाण,सय्यद अन्सार,रऊफ लाला,कैलास जोंधळे,शेख शब्बीर,सारीपुत्र गोवंदे,शेख कासीम,जगदिश सदावर्ते,ॲड.बाळासाहेब सोनकांबळे यांच्यासह आदींच्या स्वाक्ष-या आहेत