नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस तर शहरातील अनेक भागाला तळ्याचे स्वरूप
नांदेड : कुलदीप सुर्यवंशी
नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला . यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . नांदेड शहर व जिल्ह्यात आज दिनांक 11 जुलै रोजी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते . नांदेड ,लोहा, कंधार ,देगलूर ,मुखेड ,बिलोली ,नायगाव या भागात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती तर दुपारनंतर पावसाने जोर धरला होता . सायंकाळी पाचच्या सुमारास सिडको, लोहा-कंधार ,सोनखेड, मुखेड ,बाराळी ,देगलूर ,खानापूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद उमरी, भोकरसह हादगाव ,मुदखेड, अर्धापूर परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली . त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे दरम्यान नांदेड शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते तर गटारे तुंबल्याने रस्त्यावरून हे पाणी वाहत होते . नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या बेजबाबदार कामाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला