पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
प्रशासनाला जागविण्यासाठी अंशकालीण कर्मचाऱ्यांचे आत्मदहण.....! नांदेड : प्रतिनिधी  गेल्या विस वर्षापासुण पदविधर अंशकालीण कर्मचाऱ्यांना संबधित प्रशासण विभाग खेळवत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जिवण हलाखीचे झाले आहे. गेल्या अणेक वर्षापासुण विविध आंदोलणे मंञालय व जिल्हा कार्यालयासमोर करण्यात आले असुण देखील संबधीत प्रशासण विभाग चालढकल करत आहे.यामुळे नौकरीची वाट बघत  बसलेले कर्मचारी  कित्येकजण  स्वर्ग वासी झाले आहेत.तरीही प्रशासनाची झोप काय उडेणासी झाल्यामुळे" नौकरी द्या किवा मरणाची परवानगी द्या" यासाठी जिल्हाकार्यालयासमोर नउ आँगस्ट या क्रातीदिनाच्या दिवशी आत्मदहण करण्याचा इशारा दिला आहे. पदविधार अंशकालीण कर्मचाऱ्यांना कंञाटी तत्वावर शासकीय सेवेत नौकरीची संधी उपल्बध करण्याचा किमाण 2मार्च 2019 रोजी परिपञक पारीत झाले असुण 30सप्टेबर 2020 रोजी वित्त विभागातील परिपञक पारीत झाले.सामान्य प्रशासन विभाग यांचे शुध्दीपञक 22फेब्रुविरी 2021 रोजी पारीत केले.दिनांक 9/03/2021रोजी विभागिय आयुक्त कार्यालय औरंगाबाद याचे परीपञक पदविधर अंशकालीण उमेदवाराना विशेष बाब म्हणुण कंञाटी तत्वावर नियुक्ती
इमेज
मुरुडच्या रस्त्याला मुरमाचा आधार                                    _मुरुड ग्रामपंचायतीचा ढोबळ कारभार  ... ......!                                             मुरुड :- विशाल कणसे  मुरुड मधील रस्त्यावर मुरूम टाकून त्या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यावर मुरूम टाकून त्याला दुरुस्त करण्यात आले, परंतु पावसाळ्याच्या दिवसातच ग्राम पंचायतिला आता आठवण झाली का असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.                                    मुरुड हे बाजारपेठेचे सर्वात मोठे गाव असून या गावात इतर येणारे जाणारे बाहेरगावचे नागरिकांची  संख्या असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या मुख्य मार्गावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून पावसाच्या दिवसात आठवण आली का काय ? व मुरुडच्या रस्त्यांना मुरमाचा आधार अशी चर्चा नागरिक करत आहेत.
इमेज
गजभारे सुमित यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश  नांदेड : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहर उपाध्यक्ष पदी वाजेगाव येथील तरुण सक्रिय कार्यकर्ते सुमित गजभारे  यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम साहेब व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी उपमहापौर डॉ.सौ.शिलाताई कदम,प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.कल्पनाताई डोंगळीकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सिंधुताई देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष बंटी लांडगे, सरचिटणीस गणेशभाऊ तादलापूरकर, दक्षिण विधानसभा अध्यक्ष गंगाधर कवाळे पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
एम.पी.एस.सी. बेरोजगारांची लाट निर्माण करणारी फॅक्टरी आयुष्य उध्वस्त करणारी लाट तरुण-तरुणींच्या आयुष्यातील कॊरोनापेक्षाही भयंकर, जीवघेणी आणि आयुष्य उध्वस्त करणारी कोणती लाट असेल तर ती आहे स्पर्धा परीक्षेची लाट. कारकून बनविणाऱ्या फॅक्टरया तयार झाले आहे. हजारो-लाखो युवा युवतींचे मानसिक संतुलन बिघडविणाऱ्या या परीक्षा बंद करणे केव्हाही योग्य ठरेल. कारण या सर्व परीक्षा उच्च दर्जाचे कारकून तयार करण्याऱ्या फॅक्टऱ्या आहेत. साधा कारकून आणि आयएएस/उपजिल्हाधिकारी हे सुद्धा उच्च दर्जाचे कारकूनच की. फरक काही नाही. ९९-९९% नापास होतात आणि एक मोठी बेरोजगारांची फळी निर्माण होते. या परीक्षेला बसणाऱ्या युवक युवतींची आकडेवारी जर पाहिली तर थक्क होऊन जाल. परीक्षा तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि शेवटी मेरीट लिस्ट. एका पाहणीनुसार एमपीएससी पूर्वपरिक्षेकरिता एकूण ३,६०,९९० उमेदवार बसतात. त्यातील मुख्य परीक्षेला ६,८२५ उमेदवार पास केले जातात. त्यातील १,३२६ मुलाखतीला येतात. त्यामधून ४२० उमेदवारांची निवड होते. एकूण ३,६०,५७० उमेदवार नापास होतात. म्हणजेच ९९-९९ % उमेदवारांवर अपयशी म्हणून शिक्क

भाजप अनुसुचित जाती मोर्चा नांदेड ग्रामीण नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी व तालुका पदाधिकारी यांची निवड

इमेज
भाजप अनुसुचित जाती मोर्चा नांदेड ग्रामीण नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी व तालुका पदाधिकारी यांची निवड नांदेड : प्रतिनिधी  नांदेड भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आ.अविनाश घाटे,अनुसुचित जाती युवा मोर्चा मारोतराव वाडेकर,जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे देगलुर तालुकाध्यक्ष शिवाजीमामा कनकंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुढीलप्रमाणे कार्यकारणी जाहीर करण्यात आली  व्यंकटेश लोणे,राजकुंडल विठ्ठल,प्रल्हाद हाटकर,किशनराव गायकवाड,राजेंद्र मंडगीकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर जिल्हा सरचिटणिसपदी रामराव भालेराव,सुभाष गायकवाड,नामदेव कांबळे,रणजित गोणारकर,डी.टी.सुर्यवंशी,संतोष दासवाड यानंतर कार्यकारणी सदस्य म्हणून उज्वलकुमार पाळेकर,तुळशिराम कांबळे,माधव गजभारे,संजय बनसोड,देविदास कांबळे,यादव नामेवार,यादव सुर्यवंशी,यादव कवडेकर,कोषाध्यक्षपदी दिगांबर विभुते,नांदेड जिल्हा सोशल मिडीया केशव गायकवाड,मुखेड तालुकाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड,देगलुर गोपाळ टेंभुर्णे,नायगाव साहेबराव सुर्यकार,लोहा चंद्रमुणी मस्के,मुदखेड पिराजी गाडेकर,बि

विजपुरवठा सुरळीत करावा - वंचित बहुजन आघाडी

इमेज
विजपुरवठा सुरळीत करावा - वंचित बहुजन आघाडी नांदेड : जिल्हा प्रतिनिधी   नांदेड शहर व देगलुर नाका परिसरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या विज पुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाबाबत वंचित बहुजन आघाडी शहराच्या वतीने मुख्य अंभियता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नांदेड यांच्याकडे नांदेड शहर व देगलुर नाका परिसरातील विद्युत वितरण कंपनीच्या ओव्हरलोडमुळे विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे दर २ तासात या परिसराचा विद्युत पुरवठा हमखास बंद होत असतो विशेष प्रसंगी शुक्रवार  रोजी किंवा उत्सव यासारख्या दिवसात  विज पुरवठा हमखास बंद होत असतो यामुळे या परिसरातील व शहरातील दिड ते दोन लाख नागरिक त्रस्त आहेत सदरील परिसरात शहरातील एक तृतिअंश यामुळे यांच्याकडे इन्वर्टर सारख्या चैनीचे साधण साहित्य उपलब्ध नाहीत शिक्षण घेत असलेल्या  विद्यार्थी-विद्यार्थींनीना अभ्यास करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.      वारंवार आपणांस सद्यस्थिती सांगितल्या नंतरही नागरिकांच्या होणाऱ्या त्रासात काही एक कमी झालेली नाही उलट त्रास वाढलेला आहे जर आठ दिवसांत लोकांना होणारा त्रास थांबणार नसेल तर लोकशाही मार्गाने सदरी
इमेज
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस तर शहरातील अनेक भागाला तळ्याचे स्वरूप नांदेड : कुलदीप सुर्यवंशी   नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला . यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . नांदेड शहर व जिल्ह्यात आज दिनांक 11 जुलै रोजी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते . नांदेड ,लोहा, कंधार ,देगलूर ,मुखेड ,बिलोली ,नायगाव या भागात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती तर दुपारनंतर पावसाने जोर धरला होता . सायंकाळी पाचच्या सुमारास सिडको, लोहा-कंधार ,सोनखेड, मुखेड ,बाराळी ,देगलूर ,खानापूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद उमरी, भोकरसह हादगाव ,मुदखेड, अर्धापूर परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली . त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे दरम्यान नांदेड शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते तर गटारे तुंबल्याने रस्त्यावरून हे पाणी वाहत होते . नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या बेजबाबदार कामाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 36.2 मि.मी. पाऊस   नांदेड : प्रतिनिधी  जिल्ह्यात गुरुवार 8 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 36.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण 47.9 मिलीमीटर पाऊस झाला आहे.   जिल्ह्यात गुरुवार 8 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 23.5 (25.4), बिलोली- 42.3 (57.2), मुखेड- 27.9 (63.2), कंधार- 20.3 (23.1), लोहा- 23.5 (27.7), हदगाव-38.8 (39), भोकर- 59 (62.8), देगलूर- 33.6 (52.3), किनवट- 57.7 (80.5), मुदखेड- 36.6 (39), हिमायतनगर-28 (30.2), माहूर- 21.4 (34.9), धर्माबाद- 45 (65.1), उमरी- 56.3 (75.6), अर्धापूर- 26.6 (27.9), नायगाव- 52.4 (70.4) मिलीमीटर आहे. 0000
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू ▪️दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश  इच्छूक विद्यार्थी करू शकतात नाव नोंदणी   नांदेड : प्रतिनिधी  शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी दहावी नंतरच्या पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया 30 जून 2021 पासून शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेट्रीकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, प्रॉडक्शन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या शाखांचे प्रत्येकी तीन वर्षांचे अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. या केन्द्रीभूत प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या निकालापुर्वीच प्रवेश इच्छूक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी dtemaharashtra.gov.in या वेबसाईटवर शुक्रवार 23 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करुन प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले आहे.   यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ दहावीच्या गुणांनुसार प्रथम वर्षात प्रवेश मिळणार आहे. प्रथम वर्षात प्रव
जिल्ह्यातील 62 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण   नांदेड : प्रतिनिधी   जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 62 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 9 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.   मनपा क्षेत्रातील शासकीय श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय या 3 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.   शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध
इमेज
भाजपा किसान मोर्चा पदधिका-यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीत सोबत राहावे - खा.प्रतापराव पा.चिखलीकर नांदेड : कुलदीप सुर्यवंशी  मनुष्याच्या प्रमुख गरजा पैकी अन्न हि गरज सर्वात महत्त्वाची आहे व शेतकरी राजा कष्टाने आपल्याला हे सातत्याने देण्याचे काम करतो म्हणून शेतकऱ्यांच्या  आडाचणीत भाजपा किसान मोर्चा पदधिकारी यानी सोबत राहावे असे प्रतिपादन खा.प्रतापराव पा,चिखलीकर यानी भाजपा किसान मोर्चा शेतकरी संवाद अभियान कार्यक्रमात केले.यावेळी प्रमुख उदघाटक म्हणून भाजपा किसान मोर्चा प्रदेशध्यक्ष वासुदेव नाना काळे याची होती. नांदेड जिल्हा भाजपा किसान मोर्चा यांच्या वतीने दि.9 जुलै रोजी दु.12 वाजता 'शेतकरी संवाद अभियान' कार्यक्रमाची बैठक 'साईसुभाष' अंनदनगर येथे संपन्न झाली.यावेळी नांदेड चे खासदार प्रतापराव पा.चिखलीकर यानी काँग्रेस व महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.प्रत्येक विषय राज्यसरकार हे केन्द्रंसरकारचा आहे म्हणून वेळ काढुन नेत आहे.नांदेड जिल्हात काही भागातच पिकविमा कसा मंजुर केला जातो.काही नांदेडचे आमदार पिकविमा मिळण्यासाठी पत्रकबाजी करत आहेत पण प्रत्यक्षात महाराष्ट्राचे मुख्य
इमेज
देगलूर विधानसभा मतदारसंघातील २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकमंत्र्यांनी घेतला पुढाकार बिलोली : माधव एडके देगलूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी कंबर कसली असून, नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल २०८ कोटी रुपयांची ३२ विकासकामे मंजूर करण्यात आली. पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकाराने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील कामांमध्ये राज्य मार्गांच्या सुधारणेची २८ कोटी ७५ लाख रूपयांची ४ कामे तर जिल्हा व इतर मार्गांच्या सुधारणेची १७९ कोटी २१ लाख रूपयांच्या २८ कामांचा समावेश आहे. या कामांसाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सदर कामांच्या निविदा तात्काळ काढून सदर कामे प्राधान्याने पूर्ण होणार आहेत. देगलूर-बिलोली मतदारसंघातील सामान्य नागरिकांना या कामांचा मोठा लाभ होणार आहे. ही कामे मंजूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्य